आमच्याविषयी

सप्रेम वंदे मातरम ...... यंदाचे वर्ष सन २०२३ हे हिंदुस्थानातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे १३२वे वर्ष म्हणून साजरे करताना आम्हांस विशेष अत्यानंद होत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये सर्वात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करून आपल्या भारतवर्षाच्या क्रांतिकारी चळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे राष्ट्रकार्य केले. आपल्या वैभवशाली इतिहासाच्या अनेक सोनेरी पानांमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे कार्य सुवर्णाक्षराने अधोरेखित झालेले आपणांस पाहावयास मिळते.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने गेल्या १३१ वर्षात लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला असून आपल्या वैभवशाली संस्कृतीचा एक चालता बोलता महालोकोत्सव म्हणून संपूर्ण जगभरात लोकप्रिय ठरला आहे. क्रांतिकारकांचा मुकुटमणी आणि श्रद्धास्थान असणाऱ्या हिंदुस्थानातील एकमेवव्दितीय अशा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाचे १३२वे वर्ष साजरे करीत असताना...

सार्वजनिक गणेशोत्सव स्थापनेचा इतिहास, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे स्वतंत्र चळवळीतील योगदान निश्चितपणे समाजाला प्रेरणादायी ठरत असून समाजाला दिशा देण्याचे राष्टकार्य आजही निर्विवादपणे अव्याहत सुरु आहे. ऐतिहासिक १३१ वर्ष परंपरा असलेली... अन्याया विरुध्द प्रतिकार करण्याची ऊर्जा देणारी... भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते गोवा मुक्ती संग्रामापर्यंत लढवय्या क्रांतीकारकांना प्रेरणा देणारी... क्रांतिकारकांचे श्रध्दास्थान असणारी.... राक्षसाचा संहार करणारी एखाद्या घोटीव मल्लाप्रमाणे लढवय्या अविर्भावात असणारी श्री गणेशाची मूर्ती आजही देश उभारणीत सक्रिय कार्यकर्त्यांना पाठबळ देत आहे.

काही गोष्टी कालातीत असतात. स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश रुपी राक्षसांचा वध असा प्रतीकात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवला गेला आणि सध्य स्थितीला समाजातील वाईट अपप्रवृत्तींचा संहार असा क्रांतिकारी संदेश आपल्याला श्रींच्या मूर्तीतून मिळतो. हि गणेश मूर्ती स्वतः श्रीमंत भाऊसाहेबांनी आपल्या स्वहस्ते कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे. आजही तीच मूर्ती आणि मिरवणुकीचा तोच सागवानी लाकडी रथ गेली १३१ वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवात दिमाखदार स्वरूपात आपणास पाहावयास मिळतो. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ज्या वास्तूत रोवली गेली आणि हिंदुस्थानाच्या सामाजिक जीवनात लोकचळवळीचा नवा अध्याय ज्या वास्तूच्या साक्षीने रचला गेला ती वास्तू म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा राहता वाडा..... क्रांतिकारकांचे माहेरघर असणारी हि वास्तू म्हणजे भारतीय वास्तू कलेचा उत्तम नमूना. अनेक क्रांतिकारी घडामोडींना ह्या वास्तूत मूर्त स्वरूप मिळाले. समाजाचे प्रेरणा स्तोत्र म्हणून आजही हि वास्तू दिमाखात उभी आहे. देश विदेशातील अनेक नागरिक ह्या वास्तूला आजही भेट देत असतात.

सदस्य संघ

पुनीत बालन (उत्सवप्रमुख)

संजीव जावळे (अध्यक्ष)

बाळासाहेब निकम (उपाध्यक्ष)

दिलीप आडकर (सचिव)

पहिल्या बैठकीचे सदस्य

भाऊसाहेब रंगारी

ठकूजी जाधव

खंडोबा तरवडे

बाळासाहेब नातु

मामा हसबनीस

गणपतराव घोटवडेकर

लखुशेठ दंताळे

दगडुशेठ हलवाई

आण्णासाहेब पटवर्धन

बळवंत सातव

नानासाहेब खाजगीवाले

Copyright © 2022 All rights reserved
:::| powered by dimakh consultants |:::

[Best viewed in IE 10+, Firefox, Chrome, Safari, Opera.]

लाईव्ह दर्शन