आमच्याविषयी थोडक्यात



       

 यंदाचे वर्ष सन २०२०-२०२१ हे हिंदुस्थानातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२९वे वर्ष म्हणून साजरे करताना आम्हांस विशेष अत्यानंद होत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये सर्वात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करून आपल्या भारतवर्षाच्या क्रांतिकारी चळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे राष्ट्रकार्य केले. आपल्या वैभवशाली इतिहासाच्या अनेक सोनेरी पानांमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे कार्य सुवर्णाक्षराने अधोरेखित झालेले आपणांस पाहावयास मिळते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने गेल्या १२९ वर्षात लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला असून आपल्या वैभवशाली संस्कृतीचा एक चालता बोलता महालोकोत्सव म्हणून संपूर्ण जगभरात लोकप्रिय ठरला आहे. क्रांतिकारकांचा मुकुटमणी आणि श्रद्धास्थान असणाऱ्या हिंदुस्थानातील एकमेवव्दितीय अशा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाचे १२९ वेवर्ष साजरे करीत असताना... सार्वजनिक गणेशोत्सव स्थापनेचा इतिहास, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे स्वतंत्र चळवळीतील योगदान निश्चितपणे समाजाला प्रेरणादायी ठरत असून समाजाला दिशा देण्याचे राष्टकार्य आजही निर्विवादपणे अव्याहत सुरु आहे.


  • bhahusaheb